रायगड जिल्हा पोलीस

प्रेस प्रकाशन

  • प्रेस नोट 10/01/2026
    प्रेस नोट 10/01/2026
    10-Jan-2026

    खालापूर पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 09/01/2026 रोजी 18:10 वा च्या सुमारास मौजे जाभींवली गावचे हददीत पेण-खोपोली रोडवर येथे आरोपीत रा .परखंदे पो.वावोशि ता. खालापुर यांने त्याचे ताब्यातील इको कार क्रं एम.एच 46-बी.एफ-1306 ही खोपोली बाजुकडुन पेण बाजूकडे पेण-खोपोली रोडने चालवित घेवुन जात असताना आरोपीत यांने रस्त्याचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन बेदरकारपणे, अतिवेगाने चालवित रस्ता क्रॉस करीत असलेल्या मयत रा.खुटवाडी धावल्पुरी जि. अहमदनगर यांना ठोकर मारुन अपघात करुन त्याचे लहान मोठया स्वरुपाचे दुखापतीस व मृत्युस कारणीभुत झाला. याबाबत खालापूर पोलीस ठाणे गुरनं.15/2026, मोटार वाहन अधिनियम, 1988 चे कलम 184, भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 106(1),125(अ) 125(ब ) 281 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सफौ/प्रमोद पाटील हे करीत आहेत.

  • प्रेस नोट 09/01/2026
    प्रेस नोट 09/01/2026
    09-Jan-2026

    नेरळ पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 06/01/2026 रोजी 01:43 वा च्या सुमारास मौजे .कोदिवले,पो-दहिवली ता. कर्जत गावाचे हद्दीत फिर्यादी रा.कोदिवले,पो-दहिवली ता. कर्जत यांचे घराचे बाजूला असलेल्या गुरांच्या गोठ्याच्या शेजारी बोरीच्या झाडाखालुन फिर्यादी यांच्या मालकीच्या बाजूस एकूण 24,000/- रुपये व किमतीची गोवंशीय जातीच्या 02 गायी अंदाजे काळ्या रंगाच्या किवा राखाडी रंगाच्या अनोळखी कारमध्ये बसून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी संगणमत करून फिर्यादी यांच्या संमती शिवाय लबाडीचे इराद्याने स्वतःच्या फायद्याकरिता गायींना पुरेशी हालचाल करता येणार नाही व गायींना यातना होतील अशा रीतीने त्यांच्या ताब्यातील कारमध्ये निर्दयतेने भरून चोरून नेलेल्या आहेत. याबाबत नेरळ पोलीस ठाणे गुरनं.4/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2),3(5), प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध करणेबाबत अधिनियम 1960 चे कलम 11(1),11(1)(घ),11(1)(ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोहवा/सचिन वाघमारे हे करीत आहेत.

  • प्रेस नोट 08/01/2026
    प्रेस नोट 08/01/2026
    08-Jan-2026

    खालापूर पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 06/01/2026 रोजी 10:50 वा च्या सुमारास मौजे पुणे मुंबई जुन्या हायवे रोडवर आसरेवाडी गावचे हद्दीत ता.खालापुर येथे फिर्यादी रा.करंजाडे सेक्टर 5/ए प्लॉट नं-62 रिव्हरव्हियु बिÏल्डग रुम नं-406 ता.पनवेल. हे त्यांची मोटार सायकल क्र. एम.एच.46 डी.बी. 0743 यावरुन त्यांचे वडिलांना पाठीमागे बसवुन पुणे-मुंबई जुन्या हायवे रोडने चालवित घेवुन येत असताना मौजे आसरेवाडी ता.खालापुर येथे आलेवेळी आसरेवाडी गावाकडुन येणारी सफेद ग्रे रंगाची इनोव्हा क्रिस्टा कार यावरील आरोपित चालकाने त्याचे ताब्यातील वाहन कोणताही इशारा, इंडीकेटर न देता, निष्काळजीपणे, हयगयीने, बेदारकारपणे पुणे मुंबई जुन्या हायवे वरील मुंबई लेनवर चालवित आणुन फिर्यादी चालवित असलेल्या मोटार सायकल चे डाव्या बाजुला जोरात ठोकर मारुन अपघात करुन अपघातात फिर्यादी व त्यांचे वडिलांचे लहान मोठया गंभीर स्वरुपाचे दुखापती तसेच फिर्यादी यांचे मोटार सायकलचे नुकसानीस कारणीभुत होवुन अपघाताची खबर न देता अपघात ठिकाणावरुन पळुन गेला. याबाबत खालापूर पोलीस ठाणे गुरनं.10/2026, भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 281,125(अ),125(ब) सह मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 184,134,187 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोहवा/गेंड हे करीत आहेत.

  • प्रेस नोट 07/01/2026
    प्रेस नोट 07/01/2026
    07-Jan-2026

    माणगाव पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 06/01/2026 रोजी 08:30 वा च्या सुमारास मौजे विळे येथील सिमलेस कंपनीचे बाजुला वळणावर माणगाव विळे रोडवर ता. माणगांव येथे आरोपीत रा सिदधी अपार्टमेंट बिल्डींग वरची खेापोली ता खालापुर हा त्यांचे ताब्यातील शाइन मोटार सायकल नं एम एच 12 एम क्यु 8697 हीचे मागे मयत हीस बसवुन खोपोली ते पाली विळे मार्गे रायगड किल्ला असे जात असताना सिमलेस कंपनीचे बाजुला वळणावर आलेवेळी सदरचे मोटार सायकल वेगात हयगयीने रस्त्याच्या परिस्थीतीकडे दुर्लक्ष करून मोटार सायकल स्लीप होवुन अपघात केला. सदर अपघातात स्वत:चे किरकोळ दुखापतीस व मयत हीचे लहान मोठया व गंभीर दुखापतीस कारणीभुत झाला. याबाबत माणगाव पोलीस ठाणे गुरनं.6/2026, मोटार वाहन अधिनियम, 1988 चे कलम 184, भा.न्या.स.क क106(1),125(अ),125(ब),281 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास मपोसई/दीपाली जाधव ह्या करीत आहेत.

  • प्रेस नोट 06/01/2026
    प्रेस नोट 06/01/2026
    06-Jan-2026

    खालापूर पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 08/09/2025 रोजी 14:30 वा च्या सुमारास मौजे पोतदार ग्लोबल कंपनी सांगडेवाडी ता.खालापुर येथील वेअर हाउसमध्ये येथे आरोपीत रा.वृंदावन सोसायटी,ठाणे वेस्ट,जि.ठाणे हे पोतदार ग्लोबल कंपनी सांगडेवाडी ता.खालापुर या कंपनीमध्ये मॅनेंजर म्हणुन काम पाहतात फिर्यादी रा.अमरपुष्प बिल्डींग,रुम नं.203 भवानी मार्ट समोर, चिंचोली.शेकिंग खोपोली ता.खालापुर यांचे मयत भाउ रिझवान समसुध्दीन दाखवे वय-45वर्षे यांना पोतदार ग्लोबल कंपनीचे मॅनेंजर आरोपीत याने इलेक्ट्रेशनचे काम देतेवेळी मयत यास कोणतीही वर्क ऑर्डर अगर करार न करता काम करण्याचे सांगुन काम करतेवेळी आरोपीत याने कंपनीचे वेअर हाउसमध्ये त्याचे जिवितास धोका पोहचु नये याची काळजी घेणेकरीता कोणतीही सुरक्षा व्यवस्था न पुरविता हयगय व निष्काळजीपणे मयत यास उंच ठिकाणी काम करण्यास लावले दरम्यान मयत हा शिडीवरून पडुन मरण पावला असुन त्याचे मरणास कारणीभुत झाला. याबाबत खालापूर पोलीस ठाणे गुरनं.09/2026, भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 106(1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोह/श्री.जगधने हे करीत आहेत.

  • प्रेस नोट 05/01/2026
    प्रेस नोट 05/01/2026
    05-Jan-2026

    अलिबाग पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 04/01/2026 रोजी 01:00 वा च्या मौजे मापगाव येथील फिर्यादी यांचे राहते घरात ता.अलिबाग, येथे फिर्यादी यांचे राहते घरात एकमेकांशी 06 आरोपी या नावाने मराठी व हिंदी भाषेमध्ये बोलत असलेले 8 ते 9 अनोळखी इसम घराचे हॉलला असलेली स्लायडींगची खिडकी उचकटुन लोखंडी ग्रिलला असलेले लॉक तोडून घरात घुसुन चाकु, सुरे व लोखंडी रॉड चा धाक दाखवुन अंगावर धावून येवून फिर्यादी यांचे मुलाचे हात बांधुन तोंडाला सेलोटेप लावुन मुलास बळजबरीने उचलुन घराचे मागील बाजुस कंपाउंडच्या बाहेर नेवुन त्यास जिवेठार मारण्याची धमकी देवुन फिर्यादी व त्यांचे घरातील सर्व सदस्यांना मारहाण करून फिर्यादी व त्यांचे पत्नीचे अंगावर पेट्रोल ओतुन जाळुन जिवेठार मारण्याची धमकी देवुन दोघांचे हातपाय बांधुन व तोंडाला सेलो टेप लावुन त्यांचे जवळ आलेलेल्या चाकु, सु-या व लोखंडी रॉडचा धाक दाखवुन बळजबरीने एकूण 18,22,000/-रुपये किंमतीचे सोन्याचे दागीने, रोख रक्कम, घडयाळ व दोन मोबाईल असे दरोडा टाकुन जबरी चोरी करून घेवुन गेले. याबाबत अलिबाग पोलीस ठाणे गुरनं.01/2026, भारतीय न्यास संहिता 2023 चे कलम 310(2), 310(5), 311,127(2),137(2), 351(3), 131 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सपोनि/श्री.भारत फार्णे हे करीत आहेत.

  • प्रेस नोट 04/01/2026
    प्रेस नोट 04/01/2026
    04-Jan-2026

    मांडवा (सागरी) पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 30/12/2025 रोजी 23:15 वा च्या सुमारास मौजे चोढी पुलाचे अगोदर वळणावर रेवस अलिबाग रोडवर येथे मयत हा त्याचे ताब्यातील केटीएम मोटारसायकल क्रमांक एम.एच 06 सी.टी 9056 ही मांडवा ते अलिबाग अशी चालवित घेवुन जात असताना बामणसुरे गावचे हद्दीत चोंढी पुलाच्या मागील वळणावर आलेवेळी मोटारसायकल चालक हा त्याचे ताब्यातील मोटासायकल अतिवेगाने, हयगयीने व बेदारकारपणे चालवुन रस्त्याचे परिस्थीतीकडे दुर्लक्ष करून त्यास वळणाचा अंदाज न आल्याने रोडच्या बाजुला असलेल्या लोखंडी खांबास मोटारसायकलची धडक लागुन अपघात करून स्वत:चे मरणास कारणीभुत होवुन वरील मोटारसायकलच्या मागे बसलेल्या फिर्यादी यांचे लहान मोठया दुखापतीस व मोटारसायकलच्या नुकसानीस कारणीभुत झाला. याबाबत मांडवा (सागरी) पोलीस ठाणे गुरनं. 2/2026, मोटार वाहन अधिनियम, 1988 चे कलम 184, भारतीय न्याय संहिता 2023 चे 106(1),281,125(a),125(b), प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोह/श्री. प्रदीप देशमुख हे करीत आहेत.

  • प्रेस नोट 03/01/2026
    प्रेस नोट 03/01/2026
    03-Jan-2026

    महाड एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 01/01/2026 रोजी 19:00 वा च्या सुमारास मौजे नांगलवाडी गावचे हदिदत महाड-दापोली रोडवर महाड एमआयडीसी ऑफिस समोर ता. महाड येथे आरेापीत रा.दाभोळ मोहल्ला ता-महाड याने त्याचे ताबेतील मीनीडोर रीक्षा एम.एच.06 एस.3326 ही नांगलवाडी बाजुकडुन बिरवाडी बाजुकडे अतिवेगाने बेदरकारनणे रस्त्याचे परीस्थीकडे दुर्लक्ष करून वाहन चालवुन महाड एमआयडीसी ऑफिस समोर रोडचे पलीकडे थांबलेले फिर्यादी रा.प्रभात कॉलनी महाड, ता.महाड योचे वडील यांना ठोकर मारुन अपघात केला अपघातामध्ये त्योचे डोक्यास व दोन्ही हातास दोन्ही पायास लहान मोठया व गंभीर स्वरुपाच्या दुखापती करुन त्याचे मरणास कारनीभुत झाला. याबाबत महाड एमआयडीसी पोलीस ठाणे गुरनं.02/2026, 106(1),281,125(a),125(b), मोटार वाहन अधिनियम, 1988 चे कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोह/श्री.मोहिते हे करीत आहेत.

  • प्रेस नोट 02/01/2026
    प्रेस नोट 02/01/2026
    02-Jan-2026

    नेरळ पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 24/12/2025 रोजी 16:45 वा च्या सुमारास मौजे वडवली येथील भारतपेट्रोलपंप ते चिंचवली नाका रोडच्या दरम्यान आलेवेळी ता.कर्जत येथे जखमी याने त्याचे ताब्यातील सुपर स्प्लेंडर मोटार सायकल नं. एम.एच 46 ए.एम 5279 ही बदलापुर बाजुकडील रोडने चालवित घेवुन येताना मौजे वडवली येथील भारतपेट्रोल पंप ते चिंचवली नाका रोडच्या दरम्यान आलेवेळी कोणत्यातरी अज्ञान चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन रस्ताच्या परीस्थीतीकडे दुर्लक्ष करून हयगयीने, बेदरकारपणे निष्काळजीपणे चालवून जखमी याची हिरो कंपनीची स्प्लेंडर मोटारसायकल नं. एम.एच 46 ए.एम 5279 हिस ठोकर मारुन अपघात करुन अपघातात जखमी यांना लहान मोठया गंभीर स्वरूपाचे दुखापती होणेस व वाहनाचे नुकसानीस कारणीभुत झाला अपघात केल्यानंतर अपघाताची खबर न देता पळून गेला. याबाबत नेरळ पोलीस ठाणे गुरनं.1/2026, भा.न्याय संहिता 2023 कलम 281 ,125(अ),(ब) मोटार वाहन कायदा कलम 184,134. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोहवा/सचिन वाघमारे हे करीत आहेत.

  • प्रेस नोट 01/01/2026
    प्रेस नोट 01/01/2026
    01-Jan-2026

    खोपोली पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 28/12/2025 रोजी 02:15 वा च्या सुमारास मौजे पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर खोपोली एक्झिट जवळील बोगदयाचे जवळ खोपोली ता-खालापुर आरोपीत याने त्याचे ताब्यातील ट्रक क्र.21.2495 हा अतिवेगाने, हयगयीने, अविचाराने, बेदरकापणे, रस्त्याचे परिस्थितीकडे दुर्लेक्ष करून धोकादायक रित्या चालवुन ट्रक वरील नियंत्रण सुटल्याने ट्रक मधुन खाली उडी मारली असता ब्रिजचे खाली पडुन गंभीर दुखापती होवुन स्वत:`चे मरणास तसेच ट्रकचे नुकसानीस कारणीभुत झाला. याबाबत खोपोली पोलीस ठाणे गुरनं.370/2025, भारतीय न्याय संहिता कायदा 2023 106(1),281,125(A),125(B), प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोह/श्री.अमोल धायगुडे हे करीत आहेत.

  • बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना रायगड पोलीसांनी घेतले ताब्यात
    बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना रायगड पोलीसांनी घेतले ताब्यात
    13-Aug-2025

    प्रेस नोट बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना रायगड पोलीसांनी घेतले ताब्यात दि. 13/08/2025 रोजी बांगलादेशी विशेष पथकास गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे माणगाव पोलीस ठाण्याचे हद्दीतील मौजे इंदापूर गावातील सहकार नगर येथील दळवी चाळीचे गेट समोर बांगलादेशी विशेष पथक रायगड-अलिबाग यांनी केलेल्या छापा कारवाई मध्ये दोन बांगलादेशी इसम कोणतेही वैध प्रवासी कागदपत्र पासपोर्ट, व्हीजा किंवा भारत सरकाने अथवा भारतीय सिमेवरील नोंदणी अधिका-याने नेमूण दिलेल्या मार्गाव्यतीरीक्त भारत बांगलादेशी सिमेवरून चोरट्या मार्गाने घूसखोरी करून भारतीय सरहद्दील प्रवेश करून अनधिकृत वास्तव्य करताना मिळून आले त्यांना त्यांचे नाव व पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नावे – 1) माझिदा जहांगीर आलम वय – ३८ वर्षे रा.ग्राम मेरेडिया भूईयापारा, पोस्ट – खिळगाव, राज्य – ढाका, देश – बांगलादेशी 2) रसेल फारूक हुसेन वय-29 ग्राम श्रीरामपूर पोस्ट – झिगरगाछा, जि. जसोर देश बांगलादेश यांना स्थानबद्ध करून भारतदेशाची सिमापार करण्याची कारवाई मा. परकीय नागरीक नोंदणी अधिकारी तथा मा. पोलीस अधीक्षक सो, रायगड अलिबाग यांचेमार्फत करण्यात येत आहे. सदरची छापा कारवाई मा. श्रीमती आँचल दलाल, भापोसे पोलीस अधीक्षक, रायगड, श्री.अभिजीत शिवथरे, अपर पोलीस अधीक्षक, रायगड यांचे मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख पोलीस उप निरी.टी.आर.वाघमोडे, सहा.फौज संजय ठाकूर, पोहवा/1177 कल्पेश टेमकर, मपोहवा/118 रसिका सुतार, पोशि/362 श्रेयश म्हात्रे यांनी वरील प्रमाणे उल्लेखनीय कामगीरी केली.

  • सायबर पोलीस ठाणे यांची कामगिरी
    सायबर पोलीस ठाणे यांची कामगिरी
    01-Aug-2025

    दिनांक 23/05/2025 रोजी रायगड येथील सायबर पोलीस ठाणे येथे तक्रार प्राप्त झााली. तक्रारदार यांनी सांगितले की, दिनांक 05/05/2025 रोजी अज्ञात व्यक्तीने मो.क्र.912143317389 वरून काॅल करून टेलिकाॅम अॅथॅरिटी आॅफ इंडिया मधून बोलतोय असे सांगून 9 नंबर डायल करायला लावून त्यानंतर तुमचा काॅल मुंबई सायबर पोलीस स्टेशन येथे फाॅवर्ड करतो असे सांगून त्यानंतर सीबीआय मधून बोलत असल्याचे सांगून व्हीडीओ काॅल करून तुम्ही मनी लाॅन्डरींग केली आहे असे सांगून तुमच्यावर गुन्हा दाखल असून सुप्रीम कोर्टाचे अटक वारंट निघाले आहे असे सांगून त्यातून सुटायचे असेल तर तुम्हाला पैसे भरावे लागतील असे सांगून दिनांक 13/05/2025 रोजी पुन्हा मो.क्र.9063901066 वरून व्हीडीओ काॅल करून रक्कम रू.32,00,000/- लक्ष व दिनांक 20/05/2025 रोजी मो.क्र.9063901066 वरून व्हीडीओ काॅल करून रक्कम रू.34,00,000/- वेगवेगळया बॅंकेत भरायला लावून फिर्यादी यांनी रक्कम रू.66,00,000/- ची फसवणूक केली. या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता कलम 318(4), 316(2), 3(5) 238, 340 (2) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम,66 ( डी) 66 ( सी), अंतर्गत गुन्हा ( एफ.आय.आर.क्र.07/2025) नोंदविण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा तपास पोलीस अधीक्षक श्रीमती आचल दलाल, भापोसे व अपर पोलीस अधीक्षक, श्री.अभिजीत षिवथरे, यांच्या मार्गदर्षनाखाली मपोनि श्रीमती रिजवाना नदाफ, व सपोनि श्री.अमोल जाधव हे तपास करीत आहेत.

Connect
in Emergency